बाबांच्या आठवणी राहिल्या फक्त…कै. मेघश्याम पापय्या बत्तीन यांच्या आठवणींनी डोळे भरून येतात..
अहिल्यानगर
बाबांच्या आठवणी राहिल्या फक्त…

बाबा आज म्हणता म्हणता 6 महिने होतात. तुम्ही नसल्याची पोकळी निर्माण झाली आहे. तुम्ही नसल्याची खुप जाणीव होतेय.. तेव्हा काय होते …? आता काय आाहे.. ? हे अनुभवण हरे खुप कठीण आहे. अशी परीस्थिती स्विकारण म्हणजे आयुष्यातली सर्वात अवघड परीक्षा देत आहे मी अस जाणवतयं.
प्रत्येक दिवसात तुमची उत्साही वृत्ती, समाधानी, आनंदी स्वभाव नेहमी आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय बाबा. सणावाराला तुमची साठवण येतेय बाबा.
बाबा तुम्ही खुप लोकांची आयुष्य सुखी करून गेला ब-याच जणांना मदत करुन गेलात.. कित्येक जणांन नोकरी मिळवून दिली. आता तुमच्या हयाच संस्काराव मी चाललेय बाबा..
जिवलग माणसाला आपल्या आयुष्यातून निघुन जाताना बघण फार क्लेश कारक आहे. हा अनुभव येणारी मी एकटीच नाही किंवा माझी आई नाही त्यातून बाहे यायला वेळ लागणार आहे.
जाताना बाबा काहीच नाही बोलले….!! तरी पण त्यांनी सगळे काही सांगितले….!! डोळ्यात प्रश्न होते आणि उत्तर पण….!! बाबांचे बंद डोळे मला बघत होते….!! जसे काही सांगत होते तुला आता कोण सांभाळणार….!! मी त्यांचा हात हातात पकडून बसून राहिले….!!

बाबांचा पकडलेला हात हळू हळूहळू सुटू लागला…..!आणि माझ्या वाटेला आले बाबांचे शांत राहणे….!! त्यांच्या डोळ्यात एक भीती होती…..!! एक बेचेनी होती….!! जसे सांगत होते आता तुला एकटीला लढायचे आहे….!! मी ओरडले रडले बाबा उठा काहीतरी बोला….!! पण बाबा काहीच बोलले नाही….!! हळू हळूहळू बाबा मला सोडून गेले….!! आणि अशीच बाबा आणि माझी गोष्ट अधुरी राहिली….!!

माझ्या बाबांनी माझ्या जन्म प्रमाणपत्रावर सही केली, मी त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर .. त्यांनी माझा पहिला मुलीचा पोशाख निवडला, मी त्यांचा शेवटचा अंत्यसंस्काराचा… त्यांनी माझा पहिला श्वास पाहिला, मी त्यांचा शेवटचा श्वास…

वारसामध्ये फक्त पैसाच नसतो तर, कधी कधी आपल्या वडिलांची चांगली प्रतिष्ठाच पुरेशी ठरते आणि आपण जिथेही जातो, लोक आपल्याला सांगतात की तुझे वडील सगळ्यात चांगल्या माणसांपैकी एक होते…

बाबा ओळख आहात तुम्ही माझी.. तुमच्यामुळेच मी आज या जगात आहे. मी जे काही आहे ते तुमच्या मुळे बाबा… AR न्युज लेडीज स्पेशल न्युज चॅनेल, AR फुड्स , AR धाडसी क्विन भिशी ग्रुप, आणि नुकताच सुरु केलेला SR टूर्स- फक्त लेडीज साठीच…मी स्वतःचे ब्रँड निर्माण केलेत..




