ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरात 2 बिबटे असण्याची शक्यता, वन विभागाकडून ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू

अहिल्यानगर शहरातील मध्यवर्ती सावेडी उपनगरातील तारकपूर, प्रकाशपूर, सिव्हिल हडको, गंगा उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालय रोड आणि सीक्युएव्ही परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

१५ नोव्हेंबर रोजी सीक्युएव्ही परिसरात ड्रोन कॅमेऱ्यात आणि हॉटेल इंद्रायणीमागील शेतात रात्री बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, या भागात दोन वेगवेगळे बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा दाट लोकवस्तीचा आणि शासकीय कार्यालयांचा परिसर असल्याने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने परिसरात रात्रंदिवस गस्त सुरू केली आहे.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सीक्युएव्ही परिसरात पिंजरे लावण्यात आले असून ड्रोनद्वारे शोधमोहीम राबवली जात आहे. तसेच, नागरिकांनी अफवा न पसरवता रात्री एकटे बाहेर पडणे टाळावे आणि सतर्क राहावे, असे आवाहन वनविभाग व पोलिसांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे