ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

श्रीराम चौक परिसरात १२ नोव्हेंबर रोजी भरदिवसा चोरी.

अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील सावेडी उपनगरातील श्रीरामचौक परिसरात १२ नोव्हेंबर रोजी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाळासाहेब पवार यांचे कुटुंबीय बहेगावी गेले असल्याने ते घरी एकटेच होते. दुपारी १२ च्या सुमारास पवार कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर पडल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील चार ते पाच तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केली.

त्याचबरोबर त्यांच्या पाठीमागील बाजूस राहणारे अमोल सूर्यकांत झेंडे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन ते चार तोळे सोने आणि ५२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली.

भरदुपारी झालेल्या या घरफोडीच्या घटनांमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरी करतानाचा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्या फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे