ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार..

अहिल्यानगर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी म्हणजेच भाऊबीजच्या दुसर्‍या दिवशी होणार आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बँकेत सहकार विकास आघाडीला स्पष्ट बहुमत असल्याने या मंडळाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष होणार हे निश्चित आहे.

सध्या तरी अध्यक्षपदासाठी माजी खासदार डॉ. सुजय विखे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात येणार असल्याचे सांगत खुद्द डॉ. विखे यांनीच चेअरमन पदाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. दरम्यान, अध्यक्षपदासोबत बँकेच्या उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार. बँकेचे अध्यक्ष उत्तरेतील झाल्यास उपाध्यक्ष दक्षिणेचा होणार की बँकेतील दोनही पदे उत्तरेकडे राहणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांच्या सहमती एक्सप्रेसच्या सहकार विकास आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या. त्यानंतर अकोलेतील अपक्ष संजीवनी शिंदे यांनी विखे-थोरात- गडाख यांच्या मंडळासोबत सहकार करण्याचा निर्णय घेतला. यामुळे बँकेते विखे-थोरात- गडाख यांचे संख्याबळी 18 झाले आहे.

तर विरोधीत सहकार परिवर्तन मंडळाला अवघी एक तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मंडळाला दोन जागा मिळाल्या. विखे-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे. यात सध्या तरी विखे गटाचा अध्यक्ष होणार असल्याचे सांगण्यात येत असून डॉ. सुजय विखे हेच पहिले अडीच वर्षासाठी दावेदार मानले जात आहे.

अर्थात या निवडणुकीत विखे गटाचे 6 तर थोरात गटाचे 11 संचालक निवडून आले आहे. परंतू महाविकास आघाडी व महायुती असा पक्षीय बलाबलाचा विचार केला तर विखे आणि भाजपचे गटाचे संख्याबळ मोठे आहे.

जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या 21 संचालक मंडळाच्या निवडणुकीत पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात आणि शंकरराव गडाख यांच्या सहमती एक्सप्रेसच्या सहकार विकास आघाडीला तब्बल 17 जागा मिळाल्या. त्यानंतर अकोलेतील अपक्ष संजीवनी शिंदे यांनी विखे-थोरात- गडाख यांच्या मंडळासोबत सहकार करण्याचा निर्णय घेतला.

यामुळे बँकेते विखे-थोरात- गडाख यांचे संख्याबळी 18 झाले आहे. तर विरोधीत सहकार परिवर्तन मंडळाला अवघी एक तर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मंडळाला दोन जागा मिळाल्या. विखे-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसमध्ये अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा आहे.

यात सध्या तरी विखे गटाचा अध्यक्ष होणार असल्याचे सांगण्यात येत असून डॉ. सुजय विखे हेच पहिले अडीच वर्षासाठी दावेदार मानले जात आहे. अर्थात या निवडणुकीत विखे गटाचे 6 तर थोरात गटाचे 11 संचालक निवडून आले आहे. परंतू महाविकास आघाडी व महायुती असा पक्षीय बलाबलाचा विचार केला तर विखे आणि भाजपचे गटाचे संख्याबळ मोठे आहे.

दुसरीकडे माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची संगमनेरमध्ये सहकार परिवर्तन मंडळाचे एकमेव संचालक असलेले खासदार नीलेश लंके यांनी भेट घेतली. तर दिवाळीच्या निमित्ताने शेतकर्‍यांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी मंत्री विखे यांनी पाथर्डी तालुका निवडला आणि आमदार मोनिका राजळे यांच्या मतदारसंघात शेतकर्‍यांबरोबर दिवाळी साजरी केली.

यापूर्वी बँकेच्या अध्यक्षपदासाठी आमदार राजळे यांच्या नावाची चर्चा घडवून आणण्यात आली होती. त्यानंतर महिला संचालक व आमदार म्हणून त्यांचा विचार करावा अशी चर्चा सुरू झाली.

अशावेळी मंत्री विखे यांनी आ. राजळे यांच्या मतदारसंघातील कळसपिंपरी गावात शेतकर्‍याबरोबर दिवाळी साजरी करून त्या निमित्ताने आमदार राजळे यांची भेट घेतली. या घडमोडीमुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष कोण होणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र मुख्यमंत्री बँकेचा अध्यक्ष ठरविणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी वारंवार स्पष्ट केले आहे.

मग आता मुख्यमंत्री कोणाच्या नावावर शिक्कमोर्तब करतात हे आता गुरुवारी होणार अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी स्पष्ट होईल.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे