ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

दुष्काळात फटाक्यांचे भाव 30% वाढले..फटाके खरेदी साठी प्रतिसाद कमी..

अहिल्यानगर

दीपावली सणानिमित्त घरोघरी फटाक्यांची आतषबाजी करण्याची परंपरा आहे. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात फटाके विक्रीतून सुमारे ४ कोटी रुपयांची उलाढाल होते.

यंदा दुष्काळाचे सावट असतानाही फटाक्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, काही मोजक्या प्रकारच्या फटाक्यांचे दर काही अंशी घसरले आहेत. दुष्काळाचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत असताना फॅन्सी फटाक्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगतात.

दुसरीकडे, मागील वर्षी ६० रुपयांना मिळणारा सद्दाम बॉम्ब यंदा ४० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. या पाकिटात दहा फटाके असतात. हँड शॉवर (गदा), म्युझिकल लड, दोरी फटाका, कॅन शॉवर, पिकॉक, सिंगल कलर भुईनळे, हेलिकॉप्टर आणि इमू एग्ज हे यंदाचे नवीन प्रकार ग्राहकांचे आकर्षण ठरले आहेत.

फटाके खरेदीसाठी वाढली गर्दी दुष्काळामुळे सुरुवातीला प्रतिसाद कमी होता. मात्र, गेल्या दोन दिवसांत ग्राहकांची गर्दी वाढली आहे. यंदा फटाक्यांच्या दरात ३० ते ४० टक्क्यांची वाढ झाली असून, काही प्रकारांचे दर कमी झाले आहेत.

फॅन्सी फटाक्यांना मोठी मागणी असून, आवाजापेक्षा आतषबाजीला जास्त पसंती दिली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे