ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दोन शाळकरी मुलींना पळवण्याचा प्रयत्न, मुलींच्या धाडसाने प्रयत्न फसला…

श्रीरामपूर

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारात वडजाई वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना पळविण्याचा अघोरी प्रयत्न दोन अज्ञात व्यक्तींकडून करण्यात आला..

परंतु मुलींच्या धाडसामुळे हा प्रयत्न फसला. ही खळबळजनक घटना सोमवार, २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली, जेव्हा इयत्ता आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे सायकलने घरी परतत होत्या. रस्त्यात ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या सायकलला आडवे उभे राहत ‘श्रीरामपूरचा रस्ता कोणता?’ अशी विचारणा केली. त्यानंतर मुलींना भीती दाखवून सायकल, पैसे आणि खिसा तपासून काहीतरी हस्तगत करण्याचा संशयास्पद प्रयत्न त्यांनी केला. मुली घाबरल्या तरी त्यांनी प्रतिकार केला..

आणि त्याच वेळी गावातील इतर शाळकरी मुलींचा समूह येताना दिसताच अपहरणकर्त्यांनी मुलींना सोडून पळ काढला. दैव बलवत्तर म्हणून मुली सुखरूप वाचल्या असल्या तरी या धक्कादायक प्रकारामुळे भोकर परिसरातील विद्यार्थिनी व पालकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे.

ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी तालुका पोलिसांना दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे