ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बालक मंदिर महिला मंडळ शाळेस डिजिटल बोर्ड प्रदान..

अहिल्यानगर

गुरुवार 29 ऑक्टोबर 2026 रोजी रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनी यांच्यातर्फे बालक मंदिर महिला मंडळ शाळेस डिजिटल बोर्ड प्रदान करण्यात आला .

यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती केसकर होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शिनीच्या प्रा डॉ सौ. आश्लेषा भांडारकर, ॲड .सौ. अनुराधाताई आठरे , सौ.विभा तांबडे , सौ.सविता काळे या उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अस्मिता शूळ यांनी केले डिजिटल बोर्ड शाळेला मिळण्याचा उद्देश व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत शैक्षणिक प्रगतीचा अजून एक टप्पा या डिजिटल बोर्डच्याद्वारे ओलांडला आहे असे सांगितले. तसेच आपल्या मनोगतात सौ. आश्लेषा भांडारकर यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर किती मर्यादित करावा हे स्पष्ट केले. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता जरी आज पुढे येत असली तरी त्याचा वापर ठराविक मर्यादेपर्यंत करायचा आणि आपले वाचन वाढवावे याबद्दल आवर्जून सांगितले. तसेच रोटरी क्लबतर्फे शाळेला कंपोस्ट खत बनवण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

त्या स्वच्छतादूत असल्यामुळे त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड .सौ अनुराधाताई आठरे यांनी विद्यार्थ्यांना अशा तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करावी; यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करु असे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळ संस्थेच्या अध्यक्षा सौ. ज्योती केसकर होत्या.

त्यांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपला अभ्यास अधिक सुलभतेने करावा हे नमूद केले. या कार्यक्रमासाठी महिला मंडळ संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ.सौ विद्या होळेहोन्नूर ,सेक्रेटरी सौ ज्योती कुलकर्णी , खजिनदार सौ.पद्मजा धोपावकर, सौ. मीनल गंधे, सौ उमा देशमुख व श्रीमती पुष्पा चितांबर या यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरुपमा देशपांडे, आभारप्रदर्शन सौ. ठकू पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे