ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पालकांनी आपल्या नोकरी व्यवसाया बरोबरच पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे -उपमहापौर धनंजय जाधव

अहिल्यानगर

बोल्हेगाव येथील किड्स सेकंड स्कुल मध्ये पालक दिन साजरा..

नगर मधील विश्व् निर्मल फाउंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी सहज पब्लिक स्कुल मध्ये फादर डे हा दिवस साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख अहिल्यानगर महानगरपालिके चे उपमहापौर धनंजय जाधव मा. नगरसेवक मदन आढाव संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, कोषध्यक्ष संदीप गांगर्डे उपस्थित होते.

या वेळी पालकांना मार्गदर्शन करतांना धनंजय जाधव म्हणाले पालक हा कुटुंबाचा महत्वाचा घटक असतो, कुटुंबाचा कर्ता करविता असतो, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असतांना त्याचे आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष होते.या करिता पालकांनी सुद्धा आपला पाल्य शाळेत जात असतांना काय शिक्षण घेतो, त्याला कोणत्या गोष्टीची आवड आहे व तो समाधानी आहे का अश्या बारीक सारीक गोष्टी पालकांनी पाहणे गरजेचे आहे. जर पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष दिले तरच त्याचे भविष्य उज्वल होण्यास मदत होऊ शकते.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी शाळेची माहिती दिली व शाळा ही व्यवसायिकरण न करता आपण समाजाला काही तरी देणे लागतो ही भावना लक्षात ठेवून संस्था चालविली जात असून संस्थेने स्वमालकीची जागा घेतली असून लवकरच त्या ठिकाणी बांधकाम सुरु करणार असल्याची माहिती दिली. मा. नगरसेवक मदन आढाव यांनी सर्व पालकांना पालक दिना निमित्त शुभेच्छा दिल्यात. या वेळी शाळेच्या परिसरात पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुरुवातीस प. पू. माताजी श्री निर्मलादेवी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून सुरुवात करण्यात आली, या कार्यक्रमा मध्ये काही विदयार्थ्यांचे पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी पालक शिवाजी वायाळ साहेब,जितेंद्र निमसे, ऋषिकेश वायकर,सचिन खेडकर,चंदू कोकाटे, पुरुषोत्तम डेंगळे,पुंड दिपक पवार साहेब,सोनवणे साहेब, चव्हाण साहेब आदी उपस्थित होते. शाळेतील काही विदयार्थी मुले आराध्या गायकवाड,स्वरा पवार,सई पवार,वेदश्री राठोड,येवले अन्वी,शर्वरी लांडगे,अंश आढाव,ओवी चव्हाण रितिका कदम यांनी इंग्रजी मध्ये भाषणे दिलीत व नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे कोषध्यक्ष संदीप गांगर्डे यांनी केले तर आभार रुपाली जोशी यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना भाटे यांनी केले.

या वेळी शिक्षक संगीता गांगर्डे,अर्चना चव्हाण ,अनिता गायकवाड,सीमा सोनावणे , सोनाली कोरडे,राणी पवार , ज्योती सुलक्षणे,किरण जाधव सर,ऋषिकेश क्षीरसागर, पवार नीलम,भालके मनीषा आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. या वेळी पालक वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे