ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

भोरमध्ये पाण्याचा अपव्यय सुरु…

शहरातील काही नागरिकांनी नळाला तोट्या बसविल्या नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. अशा बेजबाबदार नागरिकांवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करत नसल्यामुळे दररोज पाणी आल्यावर शहरातील रस्त्यांवर पाण्याचे पाट वाहत आहेत.

सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीत भोरवासीयांनी आणि नगरपालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन करणे गरजेचे असूनही याबाबत कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

शहरातील बहुतेक नळजोडधारकांनी घरासमोर नळ घेतलेले आहेत. मात्र त्यांना नळाला तोट्या बसविल्या नसल्यामुळे पाणी आल्यानंतर वाया जात आहे. याशिवाय पाणी गेल्यानंतर रस्ते व गटारातील घाण पाणी हे पुन्हा वितरणाच्या नळात जात आहे. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारीही वाढत आहेत. दररोज पाणी आल्यानंतर शहरातील रस्त्यांवर पाणी साचत आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून नीट चालताही येत नाही. शिवाय एखादी गाडी शेजारून गेली तर रस्त्यावरील पाणी अंगावर उडाल्याने वादही होत आहेत.

नगरपालिका प्रशासनाने अशा उघड्‌या तोट्या न बसविलेल्या नळ धारकांवर त्वरित कारवाई करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा अशी मागणी काही नागरिक करू लागले आहेत. एरवी विकासाच्या गप्पा मारणारे नगरसेवकही आपल्या प्रभागातील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पुढे आलेले नाहीत. त्यामुळे नगरपालिकेच्या प्रशासनाबरोबर पदाधिकारी यांच्यावरही नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नागरिकांनी नळाला तोट्या बसविण्याचे आवाहन यापूर्वीही करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या नळांना त्वरित तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा.

आगामी काळात नगरपालिकेकडून पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्यानंतर मात्र नागरिक स्वतःहून पाण्याचा वापर कमी करतील आणि विनापरवानगी घेतलेले नळ कनेक्शनही बंद होतील.

– गजानन शिंदे, मुख्याधिकारी, भोर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे