ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आनंदी प्रवेशोत्सव, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा उत्सव

अहिल्यानगर

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी, दि. १५ जून २०२६ रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले. शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध स्वागतपर व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यात आले. यावेळी संबंधित प्रभागांतील आजी-माजी नगरसेवकांनीही शाळांना भेट देत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व प्रवेशोत्सव उपक्रमात सहभाग नोंदविला.

यावेळी विविध शाळांना मान्यवरांनी भेटी देत विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

महापौर सौ. ज्योती गाडे यांनी मनपा शाळा क्र. १७ सावेडी व मनपा शाळा क्र. ४ रेल्वे स्टेशन येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

उपमहापौर मा. धनंजय जाधव व शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी मा. जुबेर पठाण यांनी मनपा शाळा क्र. ११ सर्जेपुरा येथे उपस्थित राहून विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेश व गुलाबपुष्पांचे वितरण केले.

अतिरिक्त आयुक्त मा. नागेंद्र मुतकेकर यांनी ओंकारनगर, केडगाव येथील शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

उपायुक्त मा. शहाजान तडवी यांनी मनपा शाळा क्रमांक १६ येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शाळेतील विविध उपक्रमांची पाहणी केली.

• महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. दिपाली बारस्कर यांनी मनपा शाळा क्र. २ येथे विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वितरण केले. तसेच ‘पहिले पाऊल’ उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेण्यात आले.

• महिला व बाल विकास समिती उपसभापती सौ. वर्षा सानप यांनी आदर्शनगर, केडगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करून शैक्षणिक साहित्य व खाऊचे वितरण केले.

• महानगरपालिका प्राथमिक शाळा क्र. २३, अयोध्यानगर, केडगाव येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके व चॉकलेटचे वितरण करण्यात आले तसेच सर्व विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे