ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

सुसज्ज, स्वच्छ आणि आधुनिक अमरधामच्या दिशेने वाटचाल

अहिल्यानगर

सुसज्ज, स्वच्छ आणि आधुनिक अमरधामच्या दिशेने वाटचाल..१५ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त श्री. यशवंत डांगे यांनी शहरातील अमरधाम येथे सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सुमारे ७ कोटी रुपयांच्या निधीतून अमरधाम येथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली असून ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. कामांची गुणवत्ता, प्रगती आणि नियोजनाचा आढावा यावेळी आयुक्तांनी घेतला तसेच कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

अमरधाम हे केवळ सार्वजनिक ठिकाण नसून आपल्या आप्तस्वकीयांना अखेरचा निरोप देण्याचे, श्रद्धा, स्मृती आणि संस्कार जपणारे शहरातील अत्यंत पवित्र स्थान आहे. त्यामुळे विकासकामांसह या परिसराची स्वच्छता, पावित्र्य आणि सन्मान कायम राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.

यावेळी आयुक्त श्री. यशवंत डांगे यांच्यासमवेत उपअभियंता श्रीकांत निंबाळकर, नगरसेवक महेश लोंढे, संबंधित ठेकेदार, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी (PMC) चे प्रतिनिधी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छ, सुंदर आणि सुसज्ज अमरधाम… हीच आपल्या प्रियजनांप्रती खरी श्रद्धांजली.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे