ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

डॉ. अनिल सूर्यभान आठरे यांची जमीन व्यवहारात डॉक्टरची 14 कोटींची फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सावेडी येथील डॉक्टरची तब्बल 14 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

अमोल बबन जाधव (वय 40, रा. मोरगव्हाण, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याला सोमवारी (15 जून) येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (20 जूनपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉक्टरची फसवणूक

डॉ. अनिल सूर्यभान आठरे (वय 73, रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. त्यांनी 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 30 जणांच्या टोळीविरोधात कटकारस्थान रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा तपासकामी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

एमआयडीसीतून अटक

या गुन्ह्यातील मुख्य संशयित अमोल जाधव हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता. तो एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांच्या पथकाने जाधव याला एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे