ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहिल्यानगरचा युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव याचे अपघाती निधन..

अहिल्यानगरचा युवा क्रिकेटपटू यश अविनाश जाधव (वय २७) याचे अपघाती निधन झाले. यश हा अहिल्यानगरमधील हुंडेकरी स्पोर्ट्स अकॅडमीचा खेळाडू होता. यशने पाँडिचेरी राज्य क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पाँडिचेरी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
तसेच महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये त्याने पुणेरी बाप्पा संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तो जेट्स या संघाचा प्रमुख खेळाडू होता. त्याच्या पश्चात वडील, आई, आजी असा परिवार आहे.

