ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

कल्याणच्या वकिलाला ३० हजार रूपये देण्याचे सोलापुरी चादरी विक्रेत्याला न्यायालयाचे आदेश

कल्याणच्या एका ज्येष्ठ वकिलाला सोलापुरी चादरी देण्याचे आश्वासन एका सोलापुरच्या व्यापाऱ्याने दिले होते. या बदल्यात वकिलाने विक्रेत्याला ३० हजार रूपये दिले होते. विक्रेत्याने सोलापुरी चादरी दिल्या नाहीत. त्यासाठी घेतलेले ३० हजार रूपये वकिलाला परत केले नाहीत. त्यामुळे या फसवणूक प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात न्यायाधीश संतोष आगे यांनी सोलापुरी चादरी विक्रेत्याला वकिलाचे ३० हजार रूपये दावा दाखल झाला दिवसापासून नऊ टक्के व्याजाने परत देण्याचे आदेश दिले आहेत.

या सुनावणीला सोलापुरी चादरी विक्रेता, त्यांचे वकील हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने वादीच्या सर्व बाजू, कागदोपत्री पुरावे तपासून हा एकतर्फी निर्णय दिला. विवेक नारायण बिवलकर (५९) असे फसवणूक झालेल्या वकिलाचे नाव आहे. ते कल्याण पश्चिमेतील काळेवाडा गांधी चौक भागात राहतात. गोकुळ श्रीकिसन मर्दा (५६) असे सोलापूरच्या चादरी विक्रेत्याचे नाव आहे. मर्दा सोलापूरमधील सम्राट चौकातील एका बंगल्यात राहतात. या दाव्यात वादी ॲड. बिवलकर यांच्यातर्फे ॲड. एन. एन. काणे यांनी न्यायालयात बाजू मांडली. वादीतर्फे न्यायालयात दिलेली माहिती अशी, की वादी ॲड. विवेक बिवलकर, प्रतिवादी गोकुळ मर्दा हे इंचलकरंजी येथील डीकेटीई महाविद्यालयाचे विद्यार्थी.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना वसतीगृहात ते एका खोलीत राहत होते. ते वर्गमित्र होते. गोकुळ हे सोलापुरी चादरी तयार करणे आणि विक्री व्यवसायात होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये ॲड. बिवलकर यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना आपण अन्य काही देण्यापेक्षा सोलापुरी चादरी भेट देऊ असा विचार करून ॲड. बिवलकर यांनी आपला सोलापूरचा मित्र गोकुळ यांना संपर्क करून सोलापुरी चादरींची मागणी नोंदवली.

एका चादरीचे ३५० रूपये होतील असे गोकुळ यांनी सांगितले. चादरीवरील संकल्पचित्र निश्चित झाले की आपण दर निश्चित करू असे दोघांमध्ये ठरले. लग्न तोंडावर आल्याने वादी ॲड. बिवलकर यांनी संकल्पचित्र, दराची निश्चिती न करता गोकुळ आपला मित्रच आहे असा विचार करून त्यांना ३० हजार रूपये ऑनलाईन माध्यमातून पाठविले. गोकुळ यांनी लग्नापूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२४ मध्ये चादरी देण्याचे आश्वासन बिवलकर यांना दिले.

टाळाटाळ सुरूवात

लग्न तोंडावर आले तरी सोलापुरी चादरी मिळत नाही म्हणून ॲड. बिवलकर गोकुळ यांना संपर्क करू लागले. ते प्रतिसाद देत नव्हते. यावेळी बिवलकर यांना समजले की गोकुळ यांनी अनेक लोकांकडून पैसे उचलले आहेत. ते पैसे परत न केल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. गोकुळकडून चादरी मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे बिवलकर यांनी सोलापुरच्या अन्य एका विक्रेत्याकडे सोलापुरी चादरींची नोंदणी केली. गोकुळ यांना आपल्याकडील चादरी खरेदीची नोंदणी रद्द करत आहे. आपले पैसे परत पाठवावेत म्हणून लघुसंदेश बिवलकर यांनी पाठविला. विवाहानंतर ॲड. बिवलकर यांनी पैसे परतीसाठी गोकुळ यांच्याकडे तगादा लावला. ते प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे बिवलकर यांनी गोकुळ यांना कायदेशीर नोटीस पाठवली. त्याला त्यांनी खोट्या जबाबातून उत्तर दिले.

दाव दाखल

गोकुळ मर्दा आपले पैसे परत करण्यास टाळाटाळ करत आहेत लक्षात आल्यावर ॲड. बिवलकर यांनी ॲड. काणे यांच्या मार्फत कल्याण न्यायालयात ३० हजार रूपयांच्या परतीसाठी जुलै २०२५ मध्ये दावा दाखल केला. न्या. संतोष आगे यांनी ॲड. विवेक बिवलकर यांनी दाखल केलेले सर्व पुरावे तपासून प्रतिवादी गोकुळ मर्दा यांना दरशेकडा नऊ टक्के व्याजदराने ३० हजार रूपये परत करण्याचे आदेश दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे