ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत कोण कोण झाले बिनविरोध ?

आ. राजळे, आ. कडिले, डॉ. विखे, गडाख, घुले, कोल्हे, ससाणे, देशमुख, जगताप बिनविरोध.. आठ जागांवर खा. लंके विरुद्ध विखे-थोरात लढत..चौघा उमेदवारांबाबत चिन्ह वाटपानंतर सभापती शिंदे यांची भूमिका होणार स्पष्ट..

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालक मंडळाच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत बुधवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूूक बिनविरोधचा फुसका बार फुसका ठरला.

मोठा आटापिटा केल्यानंतर कशाबशा 9 जागा बिनविरोध झाल्या असून 12 जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, माघारीच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय व परिसारात नेते आणि समर्थकांची माघारीसाठी एकच धावपळ दिसून आली. यावेळी टेन्शन, गोंधळ, एकमेकांची विनवणी करत माघारीसाठी मनधरणीचे चित्र होते.

दरम्यान, माघारीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आठ जागांवर राष्ट्रवादीचे खा. नीलेश लंके आणि विखे-थोरात गटात लढत दिसत आहे. तर चार जागावर सभापती राम शिंदे यांनी स्वतंत्र उमेदवार जाहीर केेलेले असून या उमेदवारांविरोधात विखे-थोरात गटाच्यावतीने उमेदवार जाहीर करून चिन्ह मिळवल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सभापती शिंदे यांच्या गोटातून सांगण्यात आले. यामुळे आता माघारीनंतरच चिन्ह वाटप झाल्यावर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी काही मतदारसंघातील चित्र ठळकपणे स्पष्ट होणार आहे.

बुधवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी तालुका सोसायटी मतदारसंघातून आ. मोनिका राजळे (पाथर्डी), आ. अक्षय कर्डिले, माजी खासदार डॉ. सुजय विखे (राहाता), जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले (शेवगाव), संजीवनी उद्योग समृहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे (कोपरगाव), श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे (श्रीरामपूर) यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज माघारीने या नेत्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. तर यापूर्वीच माजी मंत्री शंकरराव गडाख (नेवासा), दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख (संगमनेर) तर बिगर शेती मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप व या नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सोसायटी मतदारसंघातील सात तर राखीव मतदारसंघात दोन अशा नऊ जागा बिनविरोध करण्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजीमंत्री बाळासाहेब थोरात या सहमती एक्सप्रेसला यांना यश आले आहे.

उर्वरित 12 जागांसाठी आता निवडणूक होत आहे. त्यात सोसायटी मतदारसंघातील अकोले, श्रीगोंदा, पारनेर, नगर, राहुरी, कर्जत व जामखेड या सात जागांसह महिला राखीवच्या दोन, अनुसूचित जाती-जमातीची एक, इतर मागसवर्गीयची एक, वि.जा.भ.जची एक या राखीवच्या पाच अशा 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आता तीन लंगडे मंडळ उभे असल्याचे प्राथमिक चित्र आहे. त्यात विखे- थोरात यांची सहमती एक्सप्रेस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र मंडळ या बँकेच्या निवडणूक रिंगणात दिसत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे