ब्रेकिंगमहाराष्ट्र
स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा लिक झाल्याची माहिती
स्टेट बँक ऑफ इंडियाचा डेटा लिक झाल्याची माहिती बाहेर आल्यानंतर आता बँकेने अधिकृतपणे यावर स्पष्टीकरण दिले आहे. बँकेने म्हटले आहे की, या घटनेमुळे काही ग्राहकांचा डेटा प्रभावित झाला असला, तरी सर्व ग्राहकांचे पैसे आणि खाती पूर्णपणे सुरक्षित आहेत.
प्राथमिक तपासणीनुसार, या सायबर आणि डेटा लीकच्या घटनेचा प्रभाव अत्यंत कमी आणि मोजक्याच ग्राहकांवर पडला आहे. बँकेच्या आर्थिक कामगिरीवर किंवा दैनंदिन सेवांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

