ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

ॲमेझॉनने आपल्या रिटर्न आणि रिफंड नियमांमध्ये मोठा बदल – आता ग्राहकाने उत्पादन परत केले किंवा रद्द केले तरी त्याला संपूर्ण पैसे परत मिळणार नाहीत.

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनवरून सातत्याने खरेदी करणाऱ्या आणि वस्तू पसंत न पडल्यास ती सहज रिटर्न करणाऱ्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

ॲमेझॉनने आपल्या रिटर्न आणि रिफंड नियमांमध्ये मोठा बदल केला असून, आता ग्राहकाने उत्पादन परत केले किंवा रद्द केले तरी त्याला संपूर्ण पैसे परत मिळणार नाहीत. कंपनीकडून आकारण्यात येणारी ‘ऑफर प्रोसेसिंग फी’ ही ऑर्डर एकदा शिप झाल्यानंतर पूर्णपणे नॉन-रिफंडेबल असेल.

नेमकी काय आहे ही ‘ऑफर प्रोसेसिंग फी’?

जेव्हा ग्राहक ॲमेझॉनवर खरेदी करताना विविध बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरील तात्काळ सवलतींचा लाभ घेतात, तेव्हा कंपनीकडून त्यावर साधारणपणे ₹४९ किंवा ठराविक रक्कम ‘ऑफर प्रोसेसिंग फी’ म्हणून आकारली जाते.

बँक डिस्काउंट ऑफर्स एकत्रित करणे, त्यांची पडताळणी करणे आणि ती प्रक्रिया हाताळण्यासाठी होणारा प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी हे नाममात्र शुल्क आकारले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

ऑर्डर रद्द वा रिटर्न केली तरी पैसे परत का मिळणार नाहीत?

नव्या नियमानुसार, एकदा का ऑर्डर कंपनीकडून कुरिअरसाठी शिप झाली, त्यानंतर ग्राहकाने ती ऑर्डर रद्द केली किंवा घरात आलेला प्रॉडक्ट कंपनीला परत केला, तरीही मूळ उत्पादनाची रक्कम परत मिळेल; मात्र त्यावर कापलेली ऑफर प्रोसेसिंग फी ग्राहकाला परत केली जाणार नाही.

विशेष म्हणजे ॲमेझॉन प्राईमचे सशुल्क सदस्यत्व घेतलेल्या नियमित ग्राहकांनाही या नियमातून कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. सर्वांनाच ही रक्कम भरावी लागणार आहे.

फ्लिपकार्टने यापूर्वीच बँक ऑफर्सवर ‘ऑफर हँडलिंग फी’ लागू केली होती. आता ॲमेझॉननेही हे शुल्क बंधनकारक आणि नॉन-रिफंडेबल केल्यामुळे वारंवार प्रॉडक्ट्स मागवून रिटर्न करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला थेट कात्री बसणार आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे