ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय
माजी महापौर संदीप कोतकर यांचे पितृछत्र हरपले – भानुदास कोतकर यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन
अहिल्यानगर

अहिल्यानगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांचे वडील भानुदास एकनाथ कोतकर (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने कोतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भानुदास कोतकर यांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कोतकर कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
संदीप कोतकर यांच्यावरील पितृछत्र हरपल्याने कोतकर कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. भानुदास कोतकर यांच्या निधनाने कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून दुःख व्यक्त केले जात आहे.
