राळेगणसिद्धीच्या विहिरी आजही भरलेल्या, पाणीटंचाई नाही, पुरस्कार रकमेतून अण्णा हजारे यांचे ‘दुष्काळमुक्तीचे मॉडेल’
पारनेर

ग्रामविकासाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राळेगणसिद्धीने दुष्काळावर मात करण्यासाठी दोन महिने अगोदरच पाणी व चाऱ्याचा आराखडा तयार केला आहे. ‘दुष्काळमुक्ती’चे हे मॉडेल तयार करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुढाकार घेतला आहे.
पुरस्काराच्या २० लाखांच्या रकमेतून साकारलेलं हे राळेवीस लाखांची देणगी : साधारण ५० वर्षांपूर्वी राळेगणसिद्धी गावाने लोकसहभागातून ‘माथा ते पायथा’ जलसंधारणाच्या कामातून गाव ‘टँकरमुक्त’ केले. यंदा दुष्काळाची भीषण तीव्रता असल्याने अण्णांनी आतापर्यंत मिळालेल्या पुरस्कारांच्या रकमेच्या व्याजातून २० लाख आपत्कालीन आराखड्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे..
जास्त खोल बोअरवर बंदी, पाणलोटाचे पुनर्भरण
केवळ पिण्यासाठी १८० फुटांपर्यंतच बोअरवेलला परवानगी द्यावी. त्यापेक्षा अधिक खोल बोअरवेलला बंदी घालावी.
राळेगणसिद्धीत ८० नालाबांध व १६ चेक डॅमच्या माध्यमातून पावसाचे वाहून जाणारे पाणी पुनर्भरणाद्वारे विहिरी व जमिनीत सोडले आहे. शिवाय शेतीसाठी पाण्याचा अनिर्बंध वापर पूर्णपणे बंद करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे हजारे यांनी सांगितले.
“राज्यातील भूगर्भातील पाण्याचा वाढता उपसा व घटलेले पुनर्भरण, यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. ‘पाण्याचा थेंब अन् थेंब अडवा आणि जिरवा’ ही राळेगणसिद्धीची संकल्पना आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जिरवण्यासाठी ठोस पावले राज्यातील ग्रामपंचायतींनी उचलली पाहिजेत. तरच आपल्याला दुष्काळाशी सामना करता येईल.”
अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक.
गणसिद्धीचे माॅडेल राज्यासाठी आदर्श ठरणार आहे.



