ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या विनोद मधुकर त्रिभुवन तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील सिध्दार्थनगर परिसरात एका महिलेच्या घरासमोर अश्लिल कृत्य करणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले.

11 जून रोजी मध्यरात्री पीडितेच्या घरासमोर काहीतरी पडल्याचा आवाज आला. महिलेने दरवाजा उघडून पाहिले असता दारात कागदी बॉक्स दिसला. महिलेने कुटुंबीयांच्या मदतीने तो बॉक्स उघडून पाहिला असता त्यामध्ये असलेल्या वस्तूमुळे महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न झाली व त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत संशयित आरोपींचा शोध सुरू केला.

तपासा दरम्यान मुख्य संशयित विनोद मधुकर त्रिभुवन (वय 43, रा. सिध्दार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा प्रकार आपला साथीदार हर्ष सुनील शेलार (वय 18) व एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने केल्याची कबुली दिली. पोलिसांनी मुख्य आरोपीसह हर्ष शेलार यास ताब्यात घेतले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे