
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती ‘आशा सिटी’ या नवीन नगररचना प्रकल्पाचा प्रारूप आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.
राहाता, संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यातील जमिनींचा समावेश असलेल्या या प्रकल्पासाठी ८ जुलै २०२६ रोजी राजपत्र प्रसिद्ध करून हरकती मागवण्यात आल्या होत्या, ज्या दाखल करण्याचा आज मंगळवार शेवटचा दिवस आहे.
या विकास आराखड्यात राहता तालुक्यातील केळवड खुर्द व बुद्रुक येथील ३९४.०८ हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याने प्रकल्पबाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आपल्या जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने विशेष ग्रामसभा बोलावून प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केला आणि वैयक्तिक हरकती प्रांताधिकाऱ्यांकडे दाखल केल्या. तसेच विरोधासाठी ‘आशा सिटी प्रकल्प बाधित शेतकरी समिती’ स्थापन केली आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की ही केवळ प्रारूप योजना असून एमआरटीपी कायद्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल, सध्या कोणतीही जमीन अधिग्रहित केलेली नाही.




