Online आणि मॉल शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे शहरांमध्ये धडाधड बंद होत आहेत दुकाने. ऐन दिवाळीच्या वेळी व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर.
अहिल्यानगर - दुकान बंद आहे..कशाची दिवाळी, ग्राहकच नाहीत..

काही महिन्यांतच २०० दुकानांना लागलें टाळे डिपार्टमेंटल स्टोअरकडे सामान्यांपासून ते विशिष्ठ ग्राहकांचा कल..
आपल्या मोहल्ल्यातील दुकानातून कधीही जाऊन सामान आणण्याचे दिवस आता संपत चालले आहेत. आता ती दुकानेच हळूहळू गायब होत आहेत. गेल्या काही महिन्यांत २०० दुकाने बंद झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मोठ्या शहरांप्रमाणेच आता मॉलमध्ये खरेदी करण्याची आवड निर्माण झाली आहे.
यामुळे छोटे दुकानदार एकतर दुकाने बंद करत आहेत किंवा व्यवसाय बदलण्यास मजबूर होत आहेत. मंडळांने असोसिएशनच्या पदाधिकान्यांशी चर्चा केली असता, अनेक दुकांने ग्राहकांच्या अभावामुळे बंद होण्याच्या मार्गावर असल्याचेही समोर आले.
दुकान बंद आहे..कशाची दिवाळी, ग्राहकच नाहीत..
शहरभरातील कॉलनी, गल्ली-मोहल्ल्यांतील दुकानदारांशी चर्चा केली असता त्यांनी अनेक अडचणी सांगितल्या. सर्वात पहिली अडचण म्हणजे दिवसेंदिवस कमी होणारा नफा आणि वाढणारा खर्च, अशी माहिती एका प्रमुख व्यापान्यांने दिली. त्यांनी सांगितले की, याशिवाय ठरावीक मर्यादेत साहित्याची विक्री होईल की नाही, हेही सांगता येत नाही. यासोबतच सर्वात मोठा धक्का शेजारी किंवा इमारतीत राहणान्या ग्राहकांकडून बसत आहे. ते थेट मॉलकडे वळत आहेत.
एका मोठ्या मॉलची अनेक आउटलेट्स शहरात सुरू झाली आहेत. जी सामान्य, छोट्या दुकानदारांचा संपूर्ण व्यवसाय खेचून घेत आहेत, खेचून घेतलाही आहे.
दिवाळीच्या ग्राहकांची गोष्ट तर दूरच, सामान्य दिवसांतही लोक थेट डिपार्टमेंटल स्टोअरकडे वळत आहेत. परिणामी, दुकानदारांना खर्च वाढवून आणि नफ्याचे प्रमाण कमी करूनही काहीच उपयोग होत नाही..




