ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन ‘पद्मशाली सखी संघम’ चा अनोखा उपक्रम – दीप प्रज्वलन फोटो शूट करुन पाठवा, जिंका आकर्षक बक्षिसे..

सोलापूर

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्याची सुरवात यजमान / मान्यवर / महिला यांच्या हस्ते दीप किंवा समई प्रज्वलन करुन शुभ कार्याची सुरुवात केली जाते. विविध शुभ कार्य, उद्घाटन आणि सणांच्या वेळी दीप व समई प्रज्वलित करण्याची परंपरा आहे.

दिवाळीत तर, प्रामुख्याने असाच दिसतो. याच अनुषंगाने सोलापूरातील ‘श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन’ आणि ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने ‘दिवाळीत दीप प्रज्वलनाचे फोटो शूट करुन पाठवा, जिंका आकर्षक बक्षिसे’ ! या स्पर्धेसाठी मोफत प्रवेश असून, 3 गटांसाठी स्वतंत्र बक्षिसे आहेत. अशी अनोखा स्पर्धा आयोजित केल्याची माहिती ‘श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा व ‘पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षा कला चन्नापट्टण यांनी दिले आहे.

फोटो पाठविण्याची अंतिम तारीख ५ ते १५ नोव्हेंबर असून ‘गट एक’ – महिला (गृहिणी)’ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, ‘ ‘गट दोन’ – युवती’ हस्ते’. आणि ‘गट तीन’ – मुली’ हस्ते दीप प्रज्वलनाचे फोटो शूट आपल्या मोबाईल मधून काढून पूर्ण नाव व संपूर्ण पत्त्यांसह +91 7263996175 या क्रमांकाच्या व्हाटस् अपवर किंवा meghaittam@gmail.com या ईमेलवर पाठवावेत.

1) व्यवसायिक फोटोग्राफर’ कडून फोटो काढू नयेत. ‘स्वतःच्याच मोबाईल’वरुन फोटो काढावेत.

2) दिवाळी अंकासाठी ‘मॉडेल’ कडून दीप प्रज्वलनाचे फोटो शूट करतात त्यासारखे फोटो काढून पाठवावेत.

3) ‘दीप’ अथवा ‘समई’, सुशोभीकरण, आजूबाजूची पवित्रता, रांगोळी, फुलांची सजावट इ. बाबी अवलोकन करण्यात येणार आहेत.

4) ‘परिक्षकांचा निर्णय अंतिम असेल’. ‘आयोजकांकडून’ कोणीही स्पर्धेत सहभाग होणार नाहीत. ही स्पर्धा सोलापूर शहर व जिल्ह्यांसाठी आहे.

5) ‘शहर व जिल्हा सोडून दुसऱ्या शहरात वास्तव्यांस राहणा-यांनी सुध्दा सहभाग घेउ शकतात’.

6) एका स्पर्धकाला ‘एकच फोटो’ पाठवावे लागेल. इतर फोटो पाठवल्यास ‘बाद’ करण्यात येईल.

या स्पर्धेसाठी अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक तथा नगरसेवक डॉ. अजय पोन्नम तर्फे ‘ब्लेंडर मशीन’, मनोज पिस्के तर्फे युवतीसाठी ‘ड्रेस’ व मुलीसाठी ‘ड्रेस’, राघवेंद्र वलसा (पुणे) कडून ‘तांब्याचा हंडा’, रोहित चन्ना (पुणे) कडून ‘मिक्सर’, नरेंद्र दारा कडून ‘आकर्षक साडी’, श्रीधर गंगूल तर्फे ‘इस्त्री’, संदीप कन्ना कडून ‘टोस्टर मशीन’, श्रीधर वडनाल तर्फे ‘सॅन्डविच मशीन’ अशा प्रकारे बक्षिसे देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी 9021551431 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, तसेच अशा दीप प्रज्वलनाच्या अनोख्या स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे.

असे आवाहन फाउंडेशनचे लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास कामूर्ती, नागेश पासकंटी, नागेश सरगम, सुकुमार सिध्दम, श्रीनिवास रच्चा, नारायण येरवा, किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, नरेंद्र दारा, मदनमोहन बुर्गुल, सखी संघमचे मेघा इट्टम, पल्लवी संगा, आरती आडम, ममता तलकोकूल, वनिता सुरम, वंशिका जक्का, कल्पना कट्टा, गीता भूदत्त, हेमा मैलारी, कविता साखरे, अंबिका म्याकल या सर्वांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे