ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

34 वर्षानंतर सापडली 7 एकर जमीन..आता भव्य क्रिकेट स्टेडियमचे स्वप्न साकारणार

अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील नेप्ती बाजार समिती परिसरातील क्रीडा उपक्रमांसाठी दान केलेली सात एकर हक्काची जमीन तब्बल ३४ वर्षांनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला परत मिळाली आहे.

मार्च १९९२ मध्ये रमेश गोविंद वाबळे यांनी ही जमीन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या नावे बक्षीसपत्र करून दिली होती; मात्र सरकारी दप्तरी नोंद होऊनही महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे तीन दशकांहून अधिक काळ या जागेची मोजणी व हद्द निश्चिती झाली नव्हती.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ क्रीडा संघटनांकडून मिळालेल्या संदर्भानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांनी जुन्या कागदपत्रांची पडताळणी करून हा शोध लावला. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागाने नुकतीच या जागेची अधिकृत मोजणी करून हद्द निश्चित केली आहे.

वाडिया पार्क मैदानावर जागेअभावी मर्यादा येत असल्याने, आता या सात एकर जागेवर भव्य क्रिकेट स्टेडियमसह इतर खेळांसाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी आमदार संग्राम जगताप पुढाकार घेणार आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे