ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

12 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी – अहिल्यानगरमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन..

अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘संत आन्ना चर्च’ आणि ‘अवसर केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जुन्या कलेक्टर ऑफिसजवळ असलेल्या संत आन्ना चर्च आवारात एका भव्य ‘रोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

मतमाऊली यात्रेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त धार्मिक उपक्रमांसोबतच युवकांच्या भविष्याचा विचार करून त्यांना स्वावलंबी बनवणे आणि मुख्य प्रवाहात आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी थेट सहभागी होणार असून, बारावी उत्तीर्ण ते पदवीधर पात्रता असलेल्या उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार व शैक्षणिक योग्यतेनुसार नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शिबिरात प्रत्यक्ष नोकरीच्या संधींसह कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि थेट मुलाखतींद्वारे निवड प्रक्रिया राबवून तरुणांना उज्ज्वल करिअरची दिशा दिली जाईल.

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी अहिल्यानगर व परिसरातील जास्तीत जास्त नोकरीइच्छुक युवक-युवतींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संत आन्ना चर्चचे प्रमुख धर्मगुरू मॅकेनरो लोपीस, सहाय्यक धर्मगुरू नाथनियल जॉर्ज आणि आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे