ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मोबाईलचा डाटा केला लिक,राहुल गुंडु पोलीस कॉन्स्टेबल निलंबित,पोलीस अधीक्षकांची कारवाई..

अहिल्यानगर

अहिल्यानगर येथे गुन्ह्याच्या तपासाची अत्यंत गोपनीय माहिती बाहेर दिल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी शनिवार, ३१ तारखेला दक्षिण मोबाईल सेल विभागातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

गुन्ह्यातील आरोपींच्या मोबाईलचा डेटा (सीडीआर) काढून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्याचे काम या विभागामार्फत केले जाते, जी माहिती तपासाच्या अनुषंगाने अत्यंत गोपनीय असते. मात्र, आरोपीशी संबंधित ही संवेदनशील माहिती प्राथमिक तपासात मोबाईल सेलमधून बाहेर लीक झाल्याचे उघडकीस आले.

पोलीस खात्याच्या सुरक्षित व्यवस्थेला छेद देण्याचा हा गंभीर प्रयत्न असल्याने पोलीस अधीक्षकांनी ही कडक कारवाई केली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी स्पष्ट केले असून, खात्याची गोपनीयता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे