ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी सुजय विखे-पाटील यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे-पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख यांची आज बिनविरोध निवड झाली.

अहिल्यानगर येथे बँकेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया पार पडली असून, या निमित्ताने जिल्ह्यातील दोन पारंपरिक राजकीय विरोधक एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. बँकेच्या २१ जागांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले जुने राजकीय वैर बाजूला सारून एकत्र येत ‘सहकार पॅनेल’ची स्थापना केली होती.

खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनेल’चा पराभव करण्यासाठी या दोन्ही दिग्गज नेत्यांनी ही युती केली होती. या सत्तासंग्रामात बाजी मारल्यानंतर सहकार पॅनेलकडून विखे-पाटील यांचे पुत्र सुजय आणि थोरात यांचे जावई रणजित देशमुख यांना बँकेच्या नेतृत्वाची महत्त्वाची पदे बिनविरोध देण्यात आली आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे