ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अजयकुमार कांकरीया,अभिनंदन अजयकुमार कांकरीया यांनी जास्त नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 58 लाख 80 हजारांची फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणासह इतरांची तब्बल 58 लाख 80 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना अहिल्यानगरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी अंबादास यनगंदुल (वय 24, रा. नालेगाव, अहिल्यानगर, मूळ रा. करमाळा, सोलापूर) यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजयकुमार कांकरीया आणि अभिनंदन अजयकुमार कांकरीया (दोघे रा. चिचोंडी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेनुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हा संपूर्ण प्रकार 9 ऑगस्ट 2025 ते 25 मार्च 2026 या कालावधीत अहिल्यानगरमधील कायनेटीक चौक परिसरात घडला. आरोपींनी फिर्यादी बालाजी आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांचा विश्वास संपादन केला. शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास भरघोस परतावा देतो, असे सांगून आरोपींनी त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाईन आणि रोख स्वरूपात एकूण 58 लाख 80 हजार रुपये उकळले. गुंतवणूक केल्यानंतर काही काळाने फिर्यादी यांनी आपल्या रकमेची आणि नफ्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी त्यांना टाळाटाळ करणारी उत्तरे देण्यास सुरुवात केली.

वारंवार मागणी करूनही आरोपींनी पैसे परत करण्यास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसात अर्ज केला होता.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे