ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘येनो अ‍ॅप’ सुरू करून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त महिलेची 21 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक

अहिल्यानगर

फेसबुक जाहिरात डाउनलोड करताच खाते रिकामे..नगरमध्ये सेवानिवृत्त महिलेची 21 हजारांची फसवणूक..

फेसबुकवरील बनावट जाहिरातीच्या माध्यमातून स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘येनो अ‍ॅप’ सुरू करून देण्याचे आमिष दाखवत एका निवृत्त महिलेची 21 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध शुक्रवारी (12 जून) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे घडले प्रकरण

दूधसागर सोसायटी, केडगाव येथे राहणाऱ्या 69 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी 7 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सावेडी परिसरातील नोबेल हॉस्पिटलसमोर असताना त्यांच्या मोबाईलवरील फेसबुक अ‍ॅपमध्ये ‘येनो अ‍ॅप सुरू करून देतो’ अशी जाहिरात दिसली.

संबंधित जाहिरात डाउनलोड केल्यानंतर एका व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला बँकेशी संबंधित असल्याचे भासवले. आरोपीने ‘येनो अ‍ॅप’ सुरू करून देण्याच्या बहाण्याने फिर्यादीकडून व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बँक खात्याची तसेच इतर महत्त्वाची माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नाशिक मुख्य शाखेतील खाते तसेच सावेडी शाखेतील खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय एकूण 21 हजार रुपये काढून घेतले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान, आपल्या खात्यातून रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शुक्रवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार अनिता मर्भळ करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे