ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

देवघरात दिवा लावताना 73 वर्षीय जेष्ठ महिलेचा मृत्यू साडीने घेतला पेट..

अहिल्यानगर

नगर तालुक्यातील निंबळक येथील अंबिका निवास परिसरात राहणाऱ्या सुमन रामनाथ गवळी या ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा आगीत गंभीररीत्या भाजून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांच्या राहत्या घरी घडली.

घरात नेहमीप्रमाणे देवघरात देवासमोर दिवा लावत असताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी क्षणार्धात त्यांना वेढल्याने त्या गंभीररीत्या होरपळल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी व स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने पुढील वैद्यकीय उपचारासाठी अहिल्यानगर येथील साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवले. सायंकाळी ५ वाजून २६ मिनिटांच्या सुमारास त्यांना या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले, परंतु भाजण्याचे प्रमाण अत्यंत गंभीर असल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली.

अखेर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी ७ वाजून १६ मिनिटांच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना दिली. डॉक्टरांनी दिलेल्या अधिकृत अहवालावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

मयत सुमन रामनाथ गवळी यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. या अनपेक्षित व अत्यंत दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण निंबळक गावात आणि परिसरात मोठी हळहळ आणि शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे