ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर शहरात विनोद खेडकर बिल्डरकडून होम लोन एजंटला मारहाण

ग्राहक फिरवल्याच्या गैरसमजातून होम लोनचे काम करणार्‍या तरूणाला सावेडी उपनगरातील जॉगिंग ट्रॅक परिसरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बिल्डरसह तिघांविरूध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

आरीफ बनेमियाँ शेख (वय 25, रा. नांदगाव शिंगवे, ता. अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार विनोद खेडकर (रा. आंबेडकर चौक, विवेकानंद अपार्टमेंट, बोल्हेगाव), एका मोबाईल क्रमांकधारक व्यक्तीसह अन्य एका अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित विनोद खेडकर हा बिल्डर असून तक्रारदार शेख हे होम लोनचे काम करतात. शनिवारी (14 नोव्हेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास सावेडी येथील जॉगिंग ट्रॅकवर शेख यांनी आपला ग्राहक फिरवल्याचा संशयिताला गैरसमज झाला.

या कारणावरून खेडकर व त्याच्या साथीदारांनी शेख यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शनिवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे