ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

रिलायन्स स्मार्ट बाजारच्या माजी कर्मचाऱ्यानेच फोडली कॅशरूम, 4.66 लाखांची रोकड लंपास….

अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील सावेडी येथील रिलायन्स स्मार्ट बाजारच्या कॅशरूममधील तिजोरी फोडून ४ लाख ६६ हजार ३९० रुपयांची रोकड चोरणाऱ्या माजी कर्मचाऱ्यासह दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत अटक केली आहे.

९ नोव्हेंबर रोजी चोरट्यांनी सर्व्हररूमच्या खिडकीचे गज कापून आणि काच फोडून ही चोरी केली होती, ज्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२, रा. बोल्हेगाव) आणि सुधीर दिनकर घोडके (वय ३९, रा. भिस्तबाग, सावेडी) यांना ताब्यात घेतले.

दोन वर्षांपूर्वी याच मॉलमध्ये काम करणाऱ्या विशालला जमा होणाऱ्या पैशांच्या ठिकाणाची इत्थंभूत माहिती असल्याने त्याने साथीदारासोबत क्विड कार व दुचाकीचा वापर करून हा चोरीचा कट रचला होता. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ४४ हजार रुपये रोकड आणि दोन वाहने असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे