ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

शिर्डी विमानतळा जवळ होणार ताज समूहाचे आलिशान हॉटेल – मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठा करार…

अहिल्यानगर

साईनगरीत धार्मिक पर्यटनाला नवी गती..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि ताज समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी यांच्यात नुकताच एक महत्त्वाचा सामंजस्य करार पार पडला.

या करारानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विमानतळ परिसरात ताज समूहाचे भव्य पंचतारांकित हॉटेल उभारले जाणार आहे.

देश-विदेशातून आणि विमानाने शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना आणि प्रवाशांना दर्जेदार निवास व आलिशान आदरातिथ्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी शिर्डी विमानतळाच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्याचे निर्देशही दिले आहेत.

या नव्या हॉटेलमुळे शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होण्यास आणि मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ARNews लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे