पद्मशाली समाजासाठी ऊगादी हा सण नवीन वर्षाची सुरुवात. या सणाचे वैशिष्ट्य काय आहे.. नक्की वाचा..
अहिल्यानगर

पद्मशाली समाजात गुढीपाडवा – ऊगादी हा अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे, कारण हा प्रामुख्याने तेलगू भाषीय समाज आहे आणि ऊगादी हा तेलगू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो.
पद्मशाली समाजातील ऊगादी सणाचे वैशिष्ट्य: – तेलगू नववर्ष पद्मशाली समाज हा आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र (विशेषतः विदर्भ) या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने राहतो. त्यांच्यासाठी गुढीपाडवा हा तेलगू पंचांगानुसार वर्षाचा पहिला दिवस ऊगादी असतो.
ऊगादी पचडी या दिवसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘ऊगादी पचडी’ बनवणे. ही पचडी ६ चवींचे (गोड, कडू, आंबट, तिखट, खारट, तुरट) मिश्रण असते, जे आयुष्यातील सुख-दुःख, आनंद-संकटे या भावनांचे प्रतीक मानले जाते. जी आरोग्य आणि समतोल दर्शवते. यामध्ये गूळ, चिंच, कैरी, कडुलिंबाची फुले, मीठ आणि मिरची/मिरी वापरली जाते.
ही पचडी बनवण्यासाठी साहित्य मिश्रित करून कडुलिंबाच्या फुलांनी सजवून नैवेद्य दाखवला जातो.. इतर (ऐच्छिक) – भाजलेली चणा डाळ, सुके खोबरे टाकतात.. ही पचडी तयार झाल्यावर देवाला नैवेद्य दाखवून सर्व कुटुंबाला प्रसाद म्हणून देतात..ही पचडी आरोग्यासाठी अतिशय चांगली असते. कारण ती शरीराला उन्हाळ्यात थंड ठेवते.

नवीन कपडे आणि सजावट लोक नवीन कपडे घालतात, घराच्या दरवाजावर आंब्याच्या पानांचे (तोरण) लावतात आणि रांगोळी काढतात.
पूजा आणि आराध्य दैवत या दिवशी मार्कंडेय ऋषी जे पद्मशाली समाजाचे कुळगुरू मानले जातात..आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते.भरभराट आणि कुटुंबातील एकतेचे प्रतीक आहे.
सर्वांना ऊगादी शुभकांशालु….




