ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धीरज परदेशी प्रकरणावरून आ.अक्षय कर्डिले म्हणाले तुमच्या मतांची आम्हाला भीक नको

अहिल्यानगर मधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात आमदार अक्षय कर्डिले यांनी आक्रमक भूमिका घेतली.

आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करताना, आरोपी अटक होत नसतील तर आम्हाला सांगा, आम्ही धरून आणू असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच, तुमच्या मतांची आम्हाला गरज नाही, तुमच्या मतांची भीक नको अशा शब्दांत आंदोलनाला राजकीय रंग देणाऱ्यांनाही त्यांनी सुनावले.धीरज परदेशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आ. कर्डिले म्हणाले, आरोपींना गजाआड करण्याची गरज आहे.

मात्र, संतापाच्या भरात त्यांनी आरोपींचे मुंडके छाटले पाहिजे असे आक्रमक वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे आंदोलनादरम्यानचा संताप आणि वातावरणाची तीव्रता स्पष्ट झाली.

तुमचे मत तुमच्याजवळच ठेवा. तुमचे मत ही नको आम्हाला आम्हाला तुमच्या मतांची भीक नको..गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामागे राजकारण असल्याचा आरोप काहींकडून केला जात असल्याचे सांगत आ. कर्डिले यांनी हा आरोप फेटाळून लावला. हे कुठलेही राजकारण नाही. तुम्हाला जर वाटत असेल की हे राजकारणासाठी सुरू आहे, तर तुमचे मत तुमच्याजवळच ठेवा. तुमचे मत ही नको आम्हाला आम्हाला तुमच्या मतांची भीक नको आणि तुम्हीही आमच्याकडे काम घेऊन येऊ नका असा थेट इशाराही त्यांनी संबंधितांना दिला.

धीरज परदेशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम राहणार असल्याचे सांगत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. धीरज परदेशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आरोपींच्या अटकेसह प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे