ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

व्हीकेसी नट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्रातील छेडा स्पेशालिटीज फूड्स प्रा. लि. या कंपन्यांवर कारवाई – परवाने निलंबित..

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने देशभरात मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील दोन खाद्य कंपन्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

त्यांच्या परिसरात खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले आहे. उत्तर प्रदेशातील व्हिकेसी नट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्रातील छेडा स्पेशालिटीज फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर कारवाई झाली आहे.

देशभरात अन्न भेसळीविरोधात मोठी मोहिम उघडली आहे. महाराष्ट्रात तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. दूध भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर दुधाचे संकलनच कमी झाले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच भारतातही अन्न भेसळीविरोधात मोठी मोहिम सुरू आहे. अन्न सुरक्षा विभागाने बेंगळुरुतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये धाड कारवाई केली आहे. त्यानंतर आता दोन मोठ्या बँडविरोधात कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील व्हीकेसी नट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्रातील छेडा स्पेशालिटीज फूड्स प्रा. लि. या कंपन्यांवर कारवाई झाली आहे..

बुरशी लागलेल्या भाज्या, मुदत संपलेले दूध अन् निकृष्ट दर्जाचे मांस..

व्हीकेसी नट्स मध्ये काय आढळले?

>> साठवलेल्या पिस्तांमध्ये जिवंत किडे सापडले.

>> गोदामाच्या भिंती आणि छतावर काळा फंगस (बुरशी) मोठ्या प्रमाणात आढळला.

>> परिसरात उंदरांची विष्ठा आणि कीटकांमुळे खराब झालेले खाद्यपदार्थ.

>> यंत्रे गंजलेली, फरशी खराब, खाद्यपदार्थांवर माशा बसलेल्या.

>> अंजीर ठेवलेल्या खुलीया क्रेटजवळ जिवंत सरडा दिसला.

>> एक कामगार बँडेज बांधलेल्या हाताने अंजीर निवडत होता..

छेडा स्पेशालिटीज फूड्स मध्ये काय आढळले?

>> कामगार हातांनी बेसनाचे पीठ मळत होते.

>> सडलेल्या कचऱ्याजवळच्या फरशीवर केळे सोलले जात होते.

>> खाद्य तेलाच्या टाक्यांभोवती फंगस, प्रोसेसिंग एरियात साचलेले घाणेरडे पाणी.

>> कीटक प्रतिबंधक जाळी फाटलेली, मृत माशा, खराब कचरा व्यवस्थापन.

>> ओल्या आणि धूळीने भरलेल्या फरशीवर कच्चा माल ठेवलेला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे