ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

महाराष्ट्रसंपादकीय

सत्य घटनेवर आधारित…बिझनेस मधील चढाओढ..

अहिल्यानगर

यावेळेस खूप ठिकाणी अनुभव अनुभवयास मिळाले.. गणपती,नवरात्र,दिवाळी दरवर्षी प्रमाणे सीजन काढायचा म्हणून सीझनमध्ये जास्त पैसे कमवायचे म्हणून बऱ्याच लेडीज असो पुरुष असो एखादी वस्तू आवाच्या सव्वा किमतीला विकतात.. अरे पण तुम्ही हा विचार करत नाही बाजारात त्याची किंमत तेवढी आहे का ??

त्या वस्तूचा आधी बाजारात तुम्ही सर्वे करायला पाहिजे.. ते किती पर्यंत जाऊ शकते याचा एक अंदाज तुम्ही विचारात घेऊन त्याचे रेट लावले पाहिजे..

पण सध्या ट्रेंड आलाय की सीजन आला सीझनमध्ये भरपूर पैसे कमवायचे.. बऱ्याच ठिकाणी दुकानांमध्ये प्रॉडक्ट ऑनलाईन वर बघून ऑनलाईन वर एवढ्या किमतीला मिळते मग तेच या आपल्या दुकानात कमी किंवा जास्त किमतीला विकायचं…

मग ते कस्टमरला पटवून सांगायचं त्याचे महत्त्व.. पण खरंच मध्ये ते ती वस्तू तेवढ्याला विकतोय की माल विकायचा म्हणून आपण विकतोय..त्यामध्ये तेवढे खरंच मार्जिन मिळतं का.. हा विचार सध्या कोणी करत नाही..

आणि आता सध्या तर सोशल मीडिया ग्रुप्समुळे लोकं जे मॅनिफॅक्चर करणारा त्याची किंमत वेगळी.. आणि रिसेलिंग करत त्याची किंमत फार जास्त जाते.. आणि सिजन काढायचा म्हणून आपण ते पटापट सेल करतो..

पण माझं सगळ्यांना सांगणे की खरंच तुम्हाला जे येतं ना त्या गोष्टी सेलिंग आणि रिसेलिंग करा व त्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा..तुमची स्वतःची त्या प्रोडक्ट्स साठी आयडेंटी निर्माण करा..

आपल्याला एवढे मिळते.. याच्यापेक्षा जास्त डबल मार्जिन काढणं हे खरंच गरजेच आहे का??..आपण एकमेकींना मदत करतोय पण त्या मदत करण्याच्या नादात चढाओढ लागली.. प्रत्येक बिझनेस मध्ये कॉम्पिटिशन वाढली.. ही चढाओढ नकोय..

मी स्वतः गेले 15 वर्षापासून या क्षेत्रात आहे.. तुम्ही सेलिंग करा. तुमच्या स्वतःच्याच प्रोडक्स ची..तुम्हाला जे येतं ते.. आणि एकमेकींना सहाय्यक करा.. ज्यांनी तुमचा बिजनेस वाढायला मदत केली.. त्या व्यक्ती कायम तुमच्या लक्षात ठेवा..

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल – व्यवसाय मार्गदर्शक , मुख्य संपादिका – श्रुती बत्तीन मॅडम..अहिल्यानगर..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे