ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गणपती बाप्पा विशेषमहाराष्ट्र

सेल्फी विथ गणपती बाप्पा 2026..आमचे डेकोरेशन आमची आरास…

आमच्या गणेशोत्सवाची सजावट “वर्तमानपत्रे बंद पडली तर?”

नाव : अनंत नमये

पत्ता : विलेपार्ले ईस्ट मुंबई

आमच्या गणेशोत्सवाची सजावट “वर्तमानपत्रे बंद पडली तर?” या सामाजिक संदेशावर आधारित आहे. डिजिटल युगात बातम्या आणि माहिती क्षणार्धात उपलब्ध होत असली, तरी सत्य, विश्वासार्ह आणि पडताळलेली माहितीचे महत्त्व आजही कायम आहे. वर्तमानपत्र हे समाजाचा आरसा असून, ते सामान्य माणसाचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे.

या सजावटीसाठी जुनी वर्तमानपत्रे, कार्डबोर्ड आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून “तंत्रज्ञान स्वीकारा, डिजिटल व्हा; पण वाचनाची सवय आणि सत्य माहितीची पडताळणी सोडू नका” असा संदेश देण्यात आला आहे.

ही संकल्पना आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना वाचन, विचार करण्याची सवय आणि माहितीची सत्यता तपासण्याचे महत्व अधोरेखित करते.

साहित्य: जुनी वर्तमानपत्रे, पुठ्ठा (फुट्टा) आणि पर्यावरणपूरक व पुनर्वापर करता येणारे साहित्य.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे