प्रायव्हेट कुरीअर कंपनी चा निष्काळजी पणा..याला जबाबदार कोण ?
AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका यांच्या कडे आल्या महिलांच्या तक्रारी

प्रायव्हेट कुरीअर कंपनी मधे आपण जेव्हा एखादी वस्तु कुरीअर करतो, तेव्हा आपण खूप चांगल्या पद्धतीने पॅकिंग करतो जेणेकरून आपली वस्तू खराब होऊ नये, किंवा तुटू नये.. किंवा आपला माल व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला मिळावा..
पण याच गोष्टीचा कुरिअर कंपनी वाले फायदा घेतात. कोणत्या ही गावातुन कुरिअर तिथुन निघताना आपण जर समोर असतो तर ते व्यवस्थित समोरच्या जागेवर ठेवलं जातं. पण नंतर जेव्हा गाडीत ते पार्सल वस्तू अक्षरशः फेकतात, त्याचे तुकडे झाले तरी ते तसेच त्याला फक्त डबल ट्रॅपिंग करतात , आणि ते पॅकिंग तसंच जाऊ देतात..

आत्तापर्यंत अशी खूप उदाहरणे समोर आलेली आहेत. कुरिअर केलेली वस्तू ( पापड, लोणचे, ज्वेलरी, गिफ्ट आयटम्स, कापुर दाणी, कापडी बॅग्ज, कपडे, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स) या सारखे कुरिअर केले जातात..
एखादी महिला बिझनेस करत असेल तर तिच्या वस्तू डायरेक्ट कुरिअर कंपनीकडून निघुन मधल्या मधे गायब होतात, नाहीतर त्याच्यातल्या निम्म्या वस्तू त्या कुरिअरमध्ये नसतात.. कधी कधी पार्सलच्या पार्सल गायब केलं जातो..
मग ह्याला जबाबदार कोण ? जेव्हा आपण कुरिअर कंपनीला विचारतो आमचं पार्सल तुमच्याकडे आले होते मग ते कुठे गेलं ? तर उडवा उडवी ची उत्तर देतात, आम्हाला माहित नाही कुठे गेले, ते तुम्हीच बघा..आम्ही त्याला जबाबदार नाही..
पण एखादी महिला जर खूप कष्टाने बिजनेस करत असेल तिचे कुरिअर बाहेर गावी जात असेल आणि या बिझनेस वर तिचे घर चालत असेल.. आणि समोरच्या व्यक्तीला कुरिअर जर व्यवस्थित मिळाले नाहीत, तर ती व्यक्ती समोरच्या महिलेला जबाबदार धरते.. कुरिअर कंपनी मधील कर्मचारी कधी कधी त्यामध्ये काय आहे ते उघडून बघतात जसा आहे तसा परत पॅकिंग करतात.. मग ह्याला जबाबदार आपण कोणाला धरायचं?
कस्टमरची सत्य गोष्ट- गोव्यात बिझनेस करणारी महिला.. तिचा गिफ्ट आयटम्स चा बिझनेस आहे, तसेच कापुर दाणी… तिला ऑर्डर मिळाली खूप मोठी.. तिने ते कुरिअर केले व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला.. पण मधल्या मधे ते कुरिअर ओपन केले गेले.. त्यातील 4 वस्तु गायब बाकी वस्तू तुटलेल्या होत्या.. मग त्या व्यक्तीने त्या महिलेला जबाबदार ठरलं की माझे निम्मे पैसे रिटर्न द्या मी बिला प्रमाणे सगळे पेमेंट केले आहेत. गोव्यातील महिलेने ऑफिसमध्ये चौकशी केली, तिला उत्तर उडवा उडवीची मिळाली, शेवटी नाईलाजास्तव निम्मे पैसे द्यावे रिटर्न करावे लागले. आणि तिच्या बिझनेस चा लॉस झाला.. त्या पेमेंट वर तिनी मुलांची क्लासेस ची फी भरली होती..
दुसऱ्या लेडीज ची सत्य गोष्ट – पुण्याहून तिने ज्वेलरी, बॅग कुरिअर केले होते..दरवेळेस जिथे करते, तिथे कुरिअर केले होते. पण समोरच्या व्यक्तीला ते कुरिअर व्यवस्थित मिळाले नाही.. त्याच्यातले पाच बॅग्ज गायब झाल्या, आणि सेम अशाच पद्धतीने तिलाही नुकसान याची भरपाई तिला समोरच्या व्यक्तीला द्यावी लागली..
आपण जेव्हा एखाद्या गाडीमध्ये विश्वासा ने पार्सल पाठवतो, तर तेव्हा जबाबदार कोणाला धरले जाते..???
AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मॅडम नी व काही अनुभव घेतला आहे.. इंडियन पोस्ट असो किंवा प्रायव्हेट कुरिअर ही गोष्ट सगळीकडेच होत आहे , खूप नुकसानही समोरच्याला होत आहे.. या बाबत कठोर कारवाई करण्यात यावी.. कुरिअर कंपनीकडून असे नुकसान होत आहे..




