गुलमोहर रोड भागातील प्रभाग क्रमांक- 3कुत्र्यांबाबत तक्रार पत्र दाखल – AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ.श्रुती बत्तीन मॅडम यांनी दाखल केले.
अहिल्यानगर

आत्तापर्यंत खूप जणांनी कुत्र्यांसाठी तक्रार पत्र आयुक्तांना,महापौरांना दिलेले आहे. पण कोणीही दखल घेतलेली नाही व लक्ष ही दिले नाही..
सावेडी भागात विशेषतः गुलमोहर रोड वर कुत्र्यांचा सुळसुळाट इतका झालेला आहे की सकाळी, दुपारी, संध्याकाळी मुलं शाळेत, क्लासला, जाताना, खेळताना, कुत्रे विनाकारण त्यांच्यावर हल्ला करतात.. त्यांना जखमी करतात. पण कोणीही याची दखल घेत नाहीये..
आत्तापर्यंत प्रभाग क्रमांक- 3 मधील खूप मुलांना, आणि वयोवृद्धांना कुत्र्यांनी जखमी केलेय.. पण एकही व्यक्ती पुढे येऊन कुत्र्यांच्या बाबतीत कोणतेही कारवाई केली नाही..

महानगरपालिका याबाबतीत लक्ष घालणार आहे का??? की एखाद्याचे प्राण जाई पर्यंत वाट बघणार आहात ????
असे AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल च्या मुख्य संपादिका सौ. श्रुती बत्तीन मॅडम यांनी महापौर ज्योतीताई ताई गाडे यांना दिलेल्या तक्रार अर्ज मधे म्हटले आहे..




