ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

एचपीव्ही लस मुलींच्या सुरक्षित भविष्याची हमी

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय एचपीव्ही (HPV) लसीकरण विशेष मोहिमेचा शुभारंभ आज बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे करण्यात आला. गर्भाशयमुख कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून मुलींचे संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्यदायी भविष्य घडावे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या शुभप्रसंगी महापौर सौ. ज्योती गाडे, महिला व बालकल्याण सभापती दिपाली बारस्कर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, महानगरपालिकेच्या नगरसेविका तसेच आशा वर्कर यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एचपीव्ही लस ही गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण देणारी प्रभावी प्रतिबंधात्मक लस असून योग्य वयात लसीकरण केल्यास भविष्यातील गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना या लसीकरण मोहिमेत सहभागी करून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे