ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जबाबदारीची नवी सुरुवात, विकासाचा दृढ संकल्प

अहिल्यानगर

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी मा.श्री.सुभाष लोंढे यांची निवड झाल्याबद्दल तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.दिपाली बारस्कर आणि उपसभापतीपदी सौ.वर्षा सानप यांची निवड झाल्याबद्दल १० मार्च २०२६ रोजी त्यांचे अभिनंदन करण्यात आले. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या पदांवर निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या प्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकाभिमुख योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी तसेच महिला व बालकल्याण क्षेत्रातील उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी या नव्या नेतृत्वाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी महापौर सौ. ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, यांसह महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत शहराच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे