ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा 50% रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना जुलै महिन्यात 50% रकमा मिळण्याचा मार्ग मोकळा – अवसायक गणेश गायकवाड यांची माहिती..

अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांसाठी मोठा दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे. पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

याबाबत डी आय सी जी सी यांचेकडे ना हरकत प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार डी आय सी जी सी कार्यालयाकडून सदरचे ना हरकत प्रमाणपत्र नुकतेच बँक प्रशासनास प्राप्त झाले आहे. त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50% इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सदर ठेवी परत करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे आरबीआय शी निगडित कामकाज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर या रकमा ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे