
कोण मारतो डल्ला आणि कोणाचे होतात हाल.
माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथे गावकऱ्याकडून राशन कमी मिळत असल्याबाबत तक्रार शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांच्या कडे आल्यामुळे संबंधित देपेगाव येथील राशन दुकानावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष त्याबाबत चौकशी केली त्यावेळी दुकानदार गिरी यांनी राशन चा माल तहसील कार्यालयाकडुनच प्रत्येक कट्ट्यात कमी येत असल्याची तक्रार त्यांच्या कडेच केली.
त्यावरुन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड.नारायण गोले पाटील यांनी गावकऱ्या समक्ष इलेक्ट्रिक वजन काट्यावर राशनच्या गहू आणि तांदळाचे काही कट्टे मोजले असता, त्यातील अनेक कट्ट्यात तीन किलो पेक्षा जास्त माल कमी मिळाला असल्याचे निदर्शनास आले, त्याचबरोबर अनेक कट्ट्यात दोन किलो पेक्षा जास्त माल कमी आल्याचे दिसून आले त्यावेळी तहसील प्रशासनातील अधिकारी श्री विकास बळवंत यांच्याशी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोले पाटील यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी उर्वरित कमी असलेले राशन नंतर पुढच्या खेपेला देण्याचे हमी दिली असता त्याच वेळी कमी असलेले राशन तुम्ही कुठून देणार..? असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. नारायण गोले पाटील यांनी केला व जर तुम्ही कमी पडलेले धान्य देत असाल तर तुम्ही काढून घेतले आहे.. तुम्ही देणार नसाल तर ते नेमके कुठे गेले आहे..? असा सवाल केला व संबंधितांची तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार वाटसाप वरुन केली, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी याकडे गांभीर्याने पाहून सामान्य गावकऱ्यांना न्याय देतील का असा प्रश्न उपस्थित झाला असून संबंधित अधिकारी श्री विकास बळवंत यांच्यावर नेमकी काय कार्यवाही करणार की पुन्हा सालो साल… राशन का माल, गिरफ्तार करेंगे लाल, और गरीबोंका ही होगा हाल.. असंच म्हणावं लागेल ही बाब शेतकरी कामगार पक्ष कदापिही खपवून घेणार नाही व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा शेतकरी कामगार पक्षाचे वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे..