ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

गुजरात, राजस्थान येथील तीर्थ स्थानाच्या यात्रेस उत्सlहात प्रारंभ..

अहिल्यानगर

श्री आनंद तीर्थ यात्रा संघ. अहिल्यानगर यांच्या वतीने अनेक वर्षांपासून भविकांना राज्यातील, परराज्यातील विविध तीर्थस्थlनांचे दर्शन व्हावे. यासाठी तीर्थ यात्रा दर्शनाचे आयोजन करत असते.

केवळ भविकांचा दर्शन भाव मनात ठेऊन ना नफा-ना तोटा या तत्वावर या यात्रेचे आयोजन केलें जाते. हे आयोजन संयोजन ईश्वर धोका, मनोज बाफना, धनेश कोठारी, राहुल सुराणा, राजेश मेहेर, सुधीर बाफना, राजेश बोरा व निलेश छाजेड अतिशय नियोजनपूर्वक करत असतात.

यामध्ये वातानूकुलीत 2×2 आरामदायक बसेस. निवास, नास्ता,भोजन मोफत वैधकीय सेवा, याचा समावेश असतो.भाविकांचा विश्वास संपादन केल्याने दरवर्षी या यात्रेसाठी प्रतिसाद वाढत चालला आहे या वर्षी गुजरात -राजस्थान येथील तीर्थस्थान दर्शन या 10 दिवसीय यात्रेच्या प्रारंभी आनंद साधनाधाम येथे परमपूज्य अलोकऋषिजी महाराज यांनी मंगलपाठ दिला.तर युवक नेते चोरडिया यांनी या यात्रेस झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला.250 यात्री यात. सहभागी झाले आहेत.

या यात्रेत नाशिक, सातपुरा, कामरेज, सुमेरू तीर्थ, अनस्थू तीर्थ, शंकेश्वर पार्श्वनाथ, पावापुरी तीर्थ, नाकोडाजी, रामदेवरा, ओशिया माताजी, बडमाताजी, सलासार बालाजी, खाटू श्यामजी, जयपूर दर्शन, आशा पुरा माताजी, सोनाजी खेतलाजी, केशरीयाजी, महुडी तीर्थ, व मणीलक्ष्मी तीर्थ याचा समावेश आहे. या सर्व तीर्थ स्थानाचे दर्शन करून दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी अहिल्या नगरला पोहचेल.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे