
आज दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता मा.सौ. शालिनीताई विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा, अ.नगर , मा.आ. संग्रामभैय्या जगताप (विधानसभा सदस्य, अ.नगर) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती मा. डॉ. सुधाताई कांकरिया, मा.श्री. राकेशजी ओला साहेब (पोलिस अधिक्षक, अ.नगर)मा. सौ. सविताताई मोरे, मा.सौ. सुवर्णाताई जगताप (माजी जिल्हा परिषद सदस्य), मा. सौ. रुपालीताई निखिल वारे , मा. श्री. उमाकांत कुलकर्णी (सदस्य, जेष्ठ नागरिक संघ), मा. श्री. सुनिल त्र्यंबके (नगरसेवक, अ.नगर, म.न.पा), मा.श्री. बाळासाहेब पवार (मा. नगरसेवक, अ.नगर म.न.पा), मा. सौ. जयश्रीताई लांडगे (प्राध्यापिका),मा.श्री. विनित पाऊलबुधे (नगरसेवक, अ.नगर, म.न.पा), मा. श्री. विठ्ठल लांडगे(संपादक, दैनिक लोक आवाज), मा.डॉ. रत्नाताई बल्लाळ (स्नेहिता संघम, अध्यक्ष), मा.सौ. सुरेखाताई विद्ये (मा.नगरसेविका, अ.नगर म.न.पा), मा.सौ. श्रीलता ताई आडेप (इनरव्हील महिला क्लब ग्रुप अध्यक्ष), मा.श्री. जालिंदर शिंदे, मा.सौ. संध्याताई पवार (नगरसेविका, अ.नगर म.न.पा.), मा.श्री. अजय म्याना (उप व्यवस्थापक महावितरण), मा.सौ. वैशालीताई नराल (समाजसेविका), मा़. प्रशांत दरेकर (त्रेता फाऊंडेशन), मा. सौ. श्रुती बत्तीन-बोज्जा ( AR news – मुख्य संपादिका ) हे सर्व जण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
प्रथमतः सौ. सारिका सिद्दम यांनी लकाकी फाऊंडेशन ही संस्था का स्थापन केली याची माहिती प्रस्तावना मधून दिली. नंतर सौ. उमा बडगु यांनी ही संस्था स्थापन करण्या मागचा हेतू सांगितला..
मा.शालिनी ताई विखे पाटील त्यांच्या भाषणात म्हणाल्या की सारिका उमा या दोघींनी ४ ५ वेळा निरोप पाठविला, फोन केले… मुळात समाजात वृध्दाश्रम निघावेत ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.आपण निर्माण केलेला वृध्दाश्रम हा निराधारां साठी असल्याचे समाधान आहे. खरे तर कोणत्याही कुटुंबातील जेष्ठ नागरिक हा त्या घरासाठी आधार असतो. अनुभवाचे मार्गदर्शन संपूर्ण कुटुंबाला होत असतो. पण आता विभक्त कुटुंब पध्दतीमुळे घरातील जेष्ठ नागरीकांना कोणी सांभाळायचे असे प्रश्न उपस्थित केले जातात हे खूप दुदैवी आहे.
आज समाजमन भौतिक सुखाच्या मार्ग धावतय. पण यामध्ये माणुसकी आपण हरतोय याची जाणीव ठेवायला कोणी तयार नाही. यामध्ये विभक्त कुटूंब पध्दतीचा सुध्दा परीणाम दिसून येतो. आत्मकेंद्री आणि स्वार्थी प्रवृती बळावल्याने आज कौटबिक जिव्हाळा कमी होत चालाय हे आपण पाहातोय. सगळीकडे हीच परीस्थीती आहे. असे मी म्हणणार नाही. पण सार्वजनिक जीवनात काम करताना अनेक लोक भेटायला येतात. कौटुंबिक कलहाच्या तक्रारी करतात. त्यावेळी समाजातील खरे दुःख समोर येते.
अनेक जेष्ठ नागरीक आधार शोधतात. त्यावेळी मग आशा वृध्दाश्रमाची गरज लागते. लकाकी फाऊंडेशन ने ओळखून निर्माण केलेला प्रकल्प खर्या अर्थाने सेवा आणि समर्पणाचा संदेश देणारा आहे.निराधार फौडेशनने स्विकारलेले हे सेवेचे व्रत आहे. कारण निराधारांना आधार तुम्हाला यायचा आहे. ज्यांना सोडून दिले आशा व्यक्तीना तुम्ही आपले मानून देत असलेला मदतीचा हात हे ईश्वरी सेवेचे कार्य आहे.
खरे तर कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींना सांभाळण्याची सक्ति असली पाहीजे. अकोले तालुक्यातील एका ग्रामपंचातीने आई वडीलांना न सांळणार्याची नावे संपतीवर न लावण्याचा ठरायच केला.पण अशीही परीस्थीती येवू नये. घरातील कोणीतीही व्यक्ति असुदेत आपल्यासाठी ती दैवत आहे असे समजून सामजस्याने सांभाळण्याची जबाबदारी स्विकारली पाहीजे. मला वाटते लकाकी फाऊंडेशन ही जबाबदारी स्विकारून अनेकांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. या वृध्दाश्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही मी देते.
अनेक जेष्ठ नागरीकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सुरू झाल्या आहेत. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल.
निराधार साठी खुप मोठा आधार या देत आहेत त्यांना कधी ही मेडीकल उपचाराची कोणती ही गरज वाटल्यास विखे पाटील फाऊंडेशन नेहमी च त्यांना मदती साठी पुढे येईल अशी घोषणा मी करते.
संग्राम भैय्या जगताप त्यांच्या भाषणात म्हणाले की महिलांना सपोर्ट, सामाजिक भावना, राजकीय पदार्पण, निवडणूक लढणे हे कोणी ही सामाजिक काम म्हणून करत नाही. पण तुम्ही चांगले पाऊल उचलले आहे. विशेषतः महिला हे काम आपले म्हणून करत आहेत याचा अभिमान वाटतो. अनेक वृध्दाश्रम आहेत, काही सामाजिक काम करून नंतर ती संस्था बंद पडते.आणि आता विभक्त कुटुंब पद्धती आहे. पुर्वी सारखं ५० कुटुंब सारखे कुटुंब आता नाही. घरातील ज्येष्ठ यांना आपण एकटे पडतो असे जाणवते आणि ते कुठे तरी आधार शोधत असतात. त्या साठी आम्ही काही जेष्ठ नागरिकांसाठी हाॅल बांधून दिले आहेत. तेथे जेष्ठ नागरिक सकाळी येतात, मनोरंजन, गप्पा गोष्टी, एकत्र जेवण करून संध्याकाळी आप आपल्या घरी जातात. इथे या दोन महिलांनी निराधार लोकांना आधार देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याला खुप खुप शुभेच्छा…
मा. निखिल वारे सर बोलताना म्हणाले की अनाथ आश्रम, वृद्धाश्रम झाले च नाही पाहिजे.. वृध्दाश्रमाची गरज का भासावी?? आपण आपल्या घरात जशी आपल्या मुलांची काळजी घेतो तशी आपण आपल्या आई वडील किंवा आजी आजोबा यांची काळजी का घेत नाही.. आपण ही जबाबदारी का स्विकारू शकत नाही.. हा प्रश्न मला पडला आहे.. पण या दोघी उमा व सारिका या मैत्रिणींनी पुढाकार घेऊन हा विचार केला की आपण वृध्दाश्रम चालू करावे. ज्यांना आधार नाही त्यांना आपण इथे आणून मानसिक, शारीरिक आधार देऊन त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून घ्यावे.. त्या बरोबर च या वृध्दाश्रमाची जागा प्रभाग क्रमांक २ ची निवड केल्या बद्दल आम्ही ४ ही नगर सेवक यांना नक्की च मदत करू.
सुत्रसंचलन श्री. दत्तात्रय वारकड यांनी देणगी दार यांची नावे वाचली..
सौ. अंबिका मेघश्याम बत्तीन व मेघश्याम पापय्या बत्तीन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी २००१ /- रू. ची देणगी, अनुराधा ताई येवले यांनी त्यांचे सासरे दिगंबर येवले आणि आई आशाताई आठरे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १०,०००/- रू. चा चेक , पद्मशाली युवाशक्ती तर्फे १० ब्लॅंकेट, डॉ, रत्ना बल्लाळ यांच्या तर्फे ५०००/- चेक, श्रीलता आडेप इनरव्हिल अहमदनगर विनस ग्रुप तर्फे ५ बेड, सुजाता पायमोडे यांच्या कडून २ डायनिंग टेबल अशी मदत केली..
शैवटी आभार प्रदर्शन सौ. श्वेता झोंड यांनी मानले. अल्पोपहार नी कार्यक्रमाची सांगता झाली आहे.