कफ सिरप दिलं आणि आमच्या मुलाच्या नाकातून रक्त आलं, ब्रेन हॅमरेज झालं

दीड वर्षांचा श्रेयांश, तीन वर्षांचा लामिन, तीन वर्षांची सुरभी शर्मा, 22 महिन्यांची अमीनाटा, अडीच वर्षांचा अनिरुद्ध आणि आणखी अशी अनेक मुलं.
भारत आणि गांबियामधली अशी मुलं आहे ज्यांचा जीव जाताना त्यांच्या आईवडिलांनी पाहिलं.
दोन महिने ते पाच वर्षांपर्यंतची मुलं.
कारण काय तर खोकला थांबण्यासाठी विषारी औषध घेतल्यामुळे त्याचं मूत्रविसर्जन बंद झालं, शरीरावर सूज आली आणि किडनी खराब झाली.मुलं रडायची मात्र त्यांचं दु:ख त्यांना सांगता यायचं नाही.
गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरच्या दरम्यान गांबियामध्ये जवळजवळ 70 मुलांचा मृत्यू झाला होता.
डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 च्या दरम्यान रामनगरमध्ये कमीत कमी 12 लोकांचा मृत्यू झाला होता.
या मृत्यूसाठी भारतीय कंपन्यांनी तयार केलेल्या कफ सिरपला जबाबदार ठरवलं गेलं.
कंपनीने आरोप चुकीचं असल्याचं सांगितलं, मात्र पीडितांचा त्यांच्यावर विश्वास नाही.
जम्मूमध्ये झालेल्या लहान मुलांच्या मृत्यूची सध्या पोलीस चौकशी करत आहेत.
गांबियामध्ये लहान मुलांच्या मृत्यूनंतर सरकारी अहवाल जारी केला. त्यात भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपला या मृत्यूंसाठी जबाबदार ठरवलं गेलं.