ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

मराठा समाजाने विवाह सोहळ्या बाबतची जाहीर केलेली आचार संहिता पद्माशाली समाजाने अंगी कारावी..

अहिल्यानगर

मराठा समाजाने विवाह सोहळ्या बाबतची जाहीर केलेली आचार संहिता पद्माशाली समाजाने अंगी कारावी –  सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा 

नुकतेच पदमशली समाजाचा झालेला उपवधू-वर परिचय मेळावा कौतुकास्पद 

नुकतेच मराठा समाजाने विवाह सोहळा पार पाडण्याबाबतची जी आचारसंहिता जाहीर केली ती खरोखरच कौतुकास्पद असून या मुळे समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल या साठी पद्मशाली समाजानेही त्याच पद्धतीने विवाह सोहळा पार पाडावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

नुकतेच अहिल्यानगर मध्ये पद्मशाली समाजाचा उपवधु-वर परिचय मेळावा संपन्न झाला, मेळाव्यासाठी समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते, संयोजकांचे मनापासून आभार व अभिनंदन. सध्याच्या काळात पद्माशाली समाजासह इतरही समाजात वर-वधू मिळणे अशक्य झाले असून विवाह जमविण्यासाठी मोठी कसरत मध्यस्थीना करावी लागत असल्याचे प्रखरतेने जाणवते, वर-वधू उच्च शिक्षण घेतल्यामुळे मोठ्या अपेक्षा ठेवून असतात तर सोशल मीडिया मुळे प्रत्येकाची पसंती काही औरच झाली आहे, कुठे तरी पसंती झाले तर नावच जुळत नाहीत आणि नाव जुळले तर वर-वधू च्या माता-पिताकडून देणे घेणे चे अपेक्षा उंचावलेल्या असतात. आणि त्यामुळेही विवाह जमत नसल्याचे निदर्शनास येतेय,अशा गोष्टी मुळे जे वर-वधू, माता पिता या बाबत गांभीर्याने विचार करतात त्यांच्यावर कुठे तरी अन्याय होत असल्याचे दिसून येते.

या साठी समाजाने जागृत होणे ही काळाची गरज आहे. आता वर-वधूला नव्हे तर त्यांच्या माता पितांना मार्गदर्शन करणे गरजेचे झालेले आहे व या पुढे असे वर-वधू परिचय मेळाव्या मध्ये त्यांच्या माता पितांना त्याच बरोबर वर वधूनांही मार्गदर्शन झाले तरच पुढील विवाह जमविण्यास येणाऱ्या समस्येंचे निराकरण झाल्याशिवाय राहणार नाही.

नुकतेच मराठा समाजाने लग्न करण्याबाबतच्या आचारसंहिता जारी केले व त्या प्रमाणे लग्न झाले नाही तर समाजाने बहिष्कार घालावा असे आवाहन केले, खरच सदर आचारसंहिता कौतुकास्पद आहेत व वृत्तपत्रातही संपूर्ण पणे मुद्देसूद प्रसिद्ध झाले पण या बाबत समाज गंभीरपणे दखल घेणे ही काळाची गरज आहे. व अश्याच आचार संहितेचे पद्मशाली समाजानेही अंगीकारावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे