ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

तपोवन परिसरात गोळीबार, एकजण गंभीर जखमी

अहिल्यानगर

सावेडी उपनगरातील तपोवन परिसराततील ढवण वस्तीवर दोन गटात झालेल्या वादातून बंदुकीतून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघे जण ताब्यात..

राहुल सांगळे, मयूर फणसे, आकाश नसाने, कुमार मराठे, भीमराज आव्हाड (सर्व रा. ढवण वस्ती, तपोवन रस्ता सावेडी ता. अहिल्यानगर)असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

याबाबत जखमी प्रमोद रामदास घोडके (वय.२४ रा. तपोवन, अहिल्यानगर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.२) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तपोवन परिसरात घडली.

या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याबाबत दोघांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे