ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी आणि भावांसाठी ‘या’ योजनेतून मिळणार 80 हजार रुपयांचे कर्ज, अर्ज कुठे करायचा ?

अहिल्यानगर

तुम्हालाही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का किंवा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे का मग आजची बातमी तुमच्या कामाची आहे. खरे तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी केंद्रातील सरकारकडून 80 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि शोषित घटकांना सरकारकडून मदत पुरवली जात आहे.

अलीकडे केंद्रातील सरकारने व्यवसाय सुरू करणाऱ्या तरुणांसाठी देखील काही महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. केंद्रातील सरकारकडून छोट्या व्यवसायिकांना मदत व्हावी म्हणून पीएम स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे.

ही योजना रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठी म्हणजेच स्ट्रीट व्हेंडर साठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना 80 हजार रुपयांपर्यंतचे व्यवसाय कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत आज आपण याच महत्त्वाकांक्षी योजनेच्या संदर्भात डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कशी आहे योजना ?

पीएमम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थीला 80 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जातात. या योजनेतून दिले जाणारे कर्ज हे तीन टप्प्यात दिले जाते. या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यासाठी तुम्हाला काहीच कारण द्यावे लागत नाही.

काहीही तारण न ठेवता या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना कर्ज मिळते. या योजनेतून फळ विक्रेते, भाजीविक्रेते तसेच रस्त्यावरील इतर विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कर्जरूपी मदत दिली जाते.

कोणतीही मालमत्ता तारण ठेवता या योजनेतून कर्ज मिळते आणि या योजनेतून पहिल्या टप्प्यात दहा हजार रुपये दिले जातात. पहिल्या टप्प्यातील कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केली की दुसऱ्या टप्प्यात 20 हजार रुपयांचे कर्ज मिळते.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कर्जाची योग्य पद्धतीने परतफेड केल्यानंतर मग पन्नास हजार रुपये कर्ज मंजूर केले जाते. अशा तऱ्हेने या योजनेच्या माध्यमातून एकूण तीन टप्प्यात 80 हजार रुपयांची मदत केली जाते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेत 3 हप्त्यांमध्ये कर्ज दिले जाणार आहे.

दरम्यान यातील पहिला हप्ता घेतल्यानंतर तो 1 वर्षाच्या मुदतीत परत करायचा आहे. जर तुम्ही पहिला हप्ता परत दिला तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीने पहिला हप्ता परत केला नाही तर त्याला पुन्हा या योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

अर्ज कुठे करायचा ..

केंद्रातील सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या या योजनेसाठी इच्छुक अर्जदार कोणत्याही बँकेत जाऊन अर्ज करू शकतात. ही एक सरकारी योजना असून या योजनेसाठी तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करु शकतात. दरम्यान बँकेत अर्ज सादर केल्यानंतर मग तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे